Arvind Jagtap on Nashik Tree Cutting: नाशिकमधील (Nashik) तपोवन (Tapovan) परिसरातील साधुग्रामच्या (Sadhugram) जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात (Nashik Tree Cutting) पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत आहे. या मुद्द्यावर आता सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून आवाज उठवत आहेत. आता मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय लेखक व पटकथाकार अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी एक मार्मिक पोस्ट करत राज्य सरकारवर (Maharashtra Government) संताप व्यक्त केलाय.  

Continues below advertisement


Arvind Jagtap Post : अरविंद जगतापांची पोस्ट


‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील संवेदनशील पत्रलेखनामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अरविंद जगताप हे समाजातील महत्त्वाच्या विषयांवर नेहमीच ठामपणे मत व्यक्त करत आले आहेत. नाशिकमधील वृक्षतोडीच्या वादावरही त्यांनी प्रभावीपणे भाष्य केले आहे. “एक एक मोठं झाड तोडून दहा दहा नवी रोपं लावायची असतील, तर मग एक एक मोठा मंत्री काढून त्याजागी दहा दहा पीए ठेवले तरी काय हरकत आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे.



Nashik Tree Cutting: सेलिब्रिटी आणि संघटनांचा पाठिंबा; आंदोलनाला मोठं बळ


दरम्यान, वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला सेलिब्रेटींनी जाहीर पाठींबा दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांसह अनेक संस्था व संघटनांनीही आंदोलनात उडी घेतली आहे. रविवारी सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी तपोवनात दाखल होत जोरदार आंदोलन छेडले. हातात निषेध फलक घेऊन राज्य सरकार व महापालिकेविरोधात घोषणा देत त्यांनी साधुग्राम परिसरातील वनक्षेत्र नष्ट करण्यास विरोध दर्शवला. तेथील जागेवर प्रस्तावित एक्झिबिशन सेंटरला विरोध करत, “येथील वृक्षांची कत्तल होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.


Sayaji Shinde on Nashik Tree Cutting: अभिनेते सयाजी शिंदे यांचा सरकारला इशारा


तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यांनी सरकारला “तपोवनातील एकाही झाडाला हात लावू नका. झाडे वाचली पाहिजेत. झुडूपंच काय पण येथील गवताच्या काडीला सुद्धा हात लागायला नको,” असा इशारा त्यांनी दिला आहे. 


आणखी वाचा


Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा, तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका: राज ठाकरे