या निर्णयामुळे मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणा एक नवा अध्याय सुरु होईल असं मत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केलं आहे. या निर्णयाचं स्वागत करत अनेक सेलिब्रिटींनी ट्विटही केलं आहे.
याबाबत मत व्यक्त करताना अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली की, 'लोकशाहीचा विजय, देशातील महिलांच्या अधिकारासाठीचा ऐतिहासिक दिवस.'
तर याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनीही याबाबत आपलं मत मांडलं. 'काही निर्णय हे पप्पू किंवा भक्तांसाठी नसतात. तीन तलाक निर्णय हा महिलांच्या सशक्तीकरणाचा विजय आहे.'
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. 'तिहेरी तलाकवरील निर्णयाचं स्वागत आहे. मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणाचा नवा अध्याय सुरु झाला आहे.'