मुंबई : मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या आगामी 'भिकारी' या सिनेमातील 'बाळा' या गाण्याने बॉलिवूड कलाकारांना वेड लावलं आहे. 'बाळा' गाण्यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी थिरकले आहेत.


बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य 'भिकारी' चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. त्यानेच हा खास व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. रणवीर सिंह, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, परिणिती चोप्रा, बॉबी देओल, तापसी पन्नू, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू यांनी 'बाळा ओ बाळा' या गाण्यावर ठेका धरला आहे.

एकमेकांचा चित्रपट प्रमोट करणं हे बॉलिवूडमध्ये नवं नाही. पण हा ट्रेण्ड मराठीतही आला आहे. बॉलिवूड कलाकार आता मराठी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

बाळा गाण्याचं शूटिंग इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात स्वप्नीलने पहिल्यांदाच हिपहॉप डान्स केला आहे. स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार यांची प्रमुख भूमिका असलेला 'भिकारी' सिनेमा येत्या 4 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Acharya1Ganesh/status/892024201099345920