याबाबत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "आम्ही फक्त आमचं काम करत आहोत."
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बाबुमोशाय बंदूकबाज'चा दमदार ट्रेलर रिलीज
नुकताच 'बाबूमोशाय बंदूकबाज'चा ट्रेलर रिलीज झाला होता. या सिनेमात नवाजुद्दीनला पाहून त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील व्यक्तिरेखेची आठवण येते. सिनेमात नवाजुद्दीन कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनचा देसी रोमँटिक अंदाजही उत्तम आहे.
कुशन नंदी दिग्दर्शित या सिनेमात नवाजुद्दीनसह दिव्या दत्ता आणि बंगाली अभिनेत्री बिदिता बेगही मुख्य भूमिकेत आहेत. 25 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर