हैदराबाद : सिनेसृष्टी जितकी ग्लॅमरस आहे, तितकंच त्यामागचं वास्तवही अतिशय भयानक आहे. कारण, आपली स्वप्नं पूर्ण करण्याच्या नादात, अनेकजण गुन्हेगारीकडे कधी झुकतात, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशीच काहीशी घटना बॉलिवूड अभिनेत्री ऋचा सक्सेनासोबत घडली आहे.
ऋचाला हैदराबाद पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणी अटक केली आहे. विशेष म्हणजे, तिच्यासोबत एका बंगाली अभिनेत्रीसह चार जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील बंगाली अभिनेत्रीचं नाव शुभ्रा चॅटर्जी असल्याचं सांगितलं जात आहे.
तर ऋचा सक्सेनासह मनीष कडकिया आणि व्यंकटेश्वर राव नावाच्या व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हैदराबादमधील पॉश बंजारा हिल्स परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमधील छापेमारीत या सर्वांना अटक करण्यात आली.
दरम्यान, या छापेमारीत सेक्स रॅकेट चालवणारा म्होरक्या हॉटेलचा मॅनेजर असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, छापेमारीनंतर तो फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटप्रकरणी बॉलिवूड आणि बंगाली अभिनेत्री अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2017 09:04 PM (IST)
बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री ऋचा सक्सेनाला हैदराबाद पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणी अटक केली आहे. विशेष म्हणजे, तिच्यासोबत एका बंगाली अभिनेत्रीसह चार जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील बंगाली अभिनेत्रीचं नाव शुभ्रा चॅटर्जी असल्याचं सांगितलं जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -