प्रेग्नन्सीच्या चर्चांवर नर्गिस फाक्रीने अखेर मौन सोडलं
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2017 12:02 PM (IST)
ब्लॅक ड्रेसमध्ये नर्गिसचं 'सो कॉल्ड' बेबी बम्प दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं. विशेष म्हणजे फोटोत नर्गिस तोंड लपवत असल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं.
मुंबई : अभिनेत्री नर्गिस फाक्री प्रेग्नंट असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये जोर धरत होती. या चर्चांवर खुद्द नर्गिसनेच मौन सोडलं आहे. मी प्रेग्नंट नाही, असं ट्विटरवर जाहीर करताना नर्गिसने अफवेला खतपाणी घालणाऱ्यांचे कान टोचले आहेत. मुंबई विमानतळावरील नर्गिसचे फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. ब्लॅक ड्रेसमध्ये नर्गिसचं 'सो कॉल्ड' बेबी बम्प दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं. विशेष म्हणजे फोटोत नर्गिस तोंड लपवत असल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं.