Babita Shivdasani : 'हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने' या गाण्याची क्रेझ आज 40 वर्षांनंतरही कायम आहे. 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री बबिता शिवदासानी (Babita Shivdasani) हिच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर बबिताने लाखो लोकांच्या हृदयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं. तिसऱ्याच सिनेमाने बबिताला 'स्टार' केलं. बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) चित्रपटात झळकल्यानंतर अभिनेत्री रातोरात सुपरस्टार झाली. करिअर पीकवर असताना अभिनेत्री लग्नबंधनात अडकली. पण हाच तिच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरला. बॉलिवूडचं सर्वात यशस्वी फिल्मी कुटुंब अर्थात कपूर घराण्याची बबिता सून झाली. 


अन् बबिता शिवदासानीची बबिता कपूर झाली...


बबिता शिवदासानीची बबिता कपूर झाली. बबिताने आपल्या दोन्ही मुलींना अभिनयाचं प्रशिक्षण दिलं. तसेच त्यांना योग्य मार्गदेखील दाखवला. बबिता कपूरच्या दोन्ही मुली करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. बबिता सौंदर्याच्या बाबतीत आघाडीवर असल्या तरी नशीबाने मात्र त्यांना साथ दिलेली नाही. ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्याने दारूच्या नशेनं अभिनेत्रीला रस्त्यावर आणलं. लग्नानंतर 35 वर्षांनी अभिनेत्री पतीपासून दूर राहिली. 


पहिल्याच चित्रपटाने मिळालेली बबिताला लोकप्रियता


बबिताचा जन्म 20 एप्रिल 1947 रोजी मुंबईतील सिंधी कुटुंबात झाला. बबिता शिवदासानीचे वडील हरि शिवदासानी हेदेखील चित्रपटांमध्ये काम करत असे. अनेक चित्रपटांत त्यांनी कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. बबीताची चुलत बहिण साधना शिवदासानीदेखील अभिनेत्री आहे. बहिणीला पासून सिनेसृष्टीत आलेल्या बबिताने 1967 मध्ये 'राज' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 


'राज' चित्रपटाआधी बबिता 'दस लाख' या चित्रपटातदेखील दिसून आली होती. अभिनेत्रीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. पण प्रेक्षकांच्या मात्र पसंतीस उतरला. त्यानंतर जितेंद्रच्या 'फर्ज' या चित्रपटात बबिता झळकली. 'फर्ज' हा बबिताच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला. या सिनेमानंतर बबिताच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांत काम केले.


प्रेमासाठी करिअरचा त्याग


बबिताने आपल्या करिअरमध्ये 24 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं आहे. सहा वर्षांच्या या फिल्मी करिअरमध्ये बबिताने अनेक आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळवली. 70 च्या दशकात बॉलिवूडचे सुपरस्टार राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर यांच्यासोबत बबिताची भेट झाली. दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 6 नोव्हेंबर 1971 रोजी ते लग्नबंधनात अडकले. 


बबिता आणि रणधीर यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर करिश्मा कपूरचा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी करिनाचा जन्म झाला. करिनाच्या जन्मानंतर बबिता आणि रणधीर यांच्यात दुरावा आला. पुढे 35 वर्षे ते वेगवेगळे राहत होते. आता पुन्हा मुंबईत ते एकत्र राहतात. 


संबंधित बातम्या


Bollywood Most Popular Actress : देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!