मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि नामांकित कलाकार दलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहीलला मुंबई पोलिसांच्या एमसी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. ध्रुवकडून नार्कोटिक्स सेलने 35 ग्राम एमडी (mephedrone) ड्रग्स सुद्धा जप्त केलं आहे.
अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मुजम्मिल अब्दुल रहमान शेख या ड्रग्ज पेडलरला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून ध्रुव ताहीलचं नाव समोर आलं होतं. 2019 पासून ते मार्च 2021 पर्यंत ध्रुव मुजम्मिल अब्दुल रहमान शेखच्या संपर्कात आला होता. आणि त्याने त्याच्याकडून ड्रग्सची मागणी केली होती. तसेच ड्रग्स विकत घेण्यासाठी ध्रुवने मुजम्मिलला सहा वेळा पैसेही दिले होते.
ध्रुव मुजम्मिलकडून वारंवार ड्रग्स घेत होता आणि तो सतत त्याच्या संपर्कात होता. आता अँटी नार्कोटिक्स सेल याचा शोध लावत आहे की, ध्रुवने हे ड्रग्स स्वतः साठी घेतले होते की, त्याच्यासोबत अजून कोणी यामध्ये सहभागी होतं? ध्रुवच्या अटकेमुळे बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटींची नावं समोर येतात का? ते पण हा महत्त्वाचं असणार आहे.
अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी आपला पदभार सांभाळल्यापासून 20 कोटींपेक्षा अधिक ड्रग्स जप्त केले आहेत. त्यांनी या कारवायांमधून मोठ्या प्रमाणावर मुंबईमधील ड्रग्स रॅकेट उध्वस्त केले आहेत. आता अँटी नार्कोटिक्स सेलच्या तपास बॉलिवूडच्या दिशेने वळतोय का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
माझा मुलगा उभरता अभिनेता : दिलीप ताहील
दलीप ताहील म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांच्या फळीतील एक नाव. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपला मुलगा ध्रुव ताहीलचा फोटो शेअर करत त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की, माझा मुलगा ध्रुव उभरता अभिनेता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :