मुंबई : अभिनेता अरशद वारसीचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं, अशी माहिती त्याने स्वत: दिली आहे. अरशदने आज सकाळी ट्वीट करत सांगितलं की, माझ्या परवानगीशिवाय ट्विटर अकाउंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज आहे.





अरशदने ट्वीट करत सांगितलं की, "माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय माझ्या अकाउंटवरून काही मेसेज इतर युजर्सना पाठवण्यात आले, तसेच पासवर्डही बदलण्यात आला. मला आशा आहे, की लवकरच माझं ट्विटर अकाउंट पुन्हा पूर्ववत होईल."





अरशद सध्या इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' सिनेमात दिसणार आहे. 'धमाल' सिनेमाच्या सीरिजमधील हा तिसरा सिनेमा असणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख, जावेद जाफरी, अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि ईशा गुप्ता झळकणार आहे.


अरशदने 1996मध्ये 'तेरे मेरे सपने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील सर्किटच्या भूमिकेमुळे अरशदची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली. या भूमिकेसाठी अरशदला फिल्म फेअरचा बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता.