सलमान आपल्या आईला पायऱ्या चढण्यास मदत करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 'ये बंधन तो प्यार का बंधन है', असं कॅप्शन त्याने व्हिडीओ शेयर करताना दिलं आहे. हे गाणं सलमानचा सुपरहिट चित्रपट 'करण-अर्जुन'चं टायटल साँग आहे.
सलमान आपल्या बिझी शेड्यूलमधूनही आईसाठी वेळ देतो, हे या व्हिडीओतून दिसत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी सलमानने आईसोबतचा फोटो शेअर करुन 'माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीसोबत', असं कॅप्शन दिलं होतं.
दरम्यान, सलमानचा आगामी 'भारत' चित्रपट अली अब्बास जाफर दिग्दर्शित करणार आहे. सिनेमात सलमानशिवाय कतरीना कैफ, दिशा पटानी, तब्बू, सुनील ग्रोव्हर आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुढील वर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.