मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला आणि शेजारच्या सत्यमूर्ती रेसिडेन्सीच्या आवारातील आठ ते नऊ फूट जागा मुंबई महापालिका ताब्यात घेणार आहे. जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या बंगल्यांची जागा ताब्यात घेण्यात येणार आहे.

जुहूतील या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने 45 फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे 60 फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे महापालिकेचं म्हणणं आहे.


जागा घेण्याबाबात महापालिकेने या दोघांनाही नोटीस पाठवली होती. परंतु अमिताभ बच्चन यांच्याकडून या नोटीसचं कोणतंही उत्तर अद्याप आलेलं नाही. तर नोटीस मिळताच के व्ही सत्यमूर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगितीचा आदेश दिला नाही. त्यामुळे आता महापालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

महानायकाचा 'आशियाना'

मुंबईत बिग बींचे पाच बंगले आहेत

प्रतीक्षा, जलसा, जनक, आशियानासह एक बंगला

ज्यांची किंमत अंदाजे 300 कोटींच्या घरात आहे

जलसा बंगल्यात अमिताभ यांचं कुटुंब राहतं

जनक बंगल्यात अमिताभ यांचं कार्यालय आहे

नात आराध्यासाठी आशियाना बंगल्याची खरेदी केली आहे

संघर्षाच्या काळात अभिनेते आणि दिग्दर्शक मेहमूद यांच्या घरी अमिताभ काही काळ राहिले होते. आज मुंबईत त्यांचे स्वतःच्या मालकीचे पाच आलिशान बंगले आहेत.

VIDEO | अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दिवार'वर महापालिकेचा हातोडा? | स्पेशल रिपोर्ट