RRR OTT Release :  बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कलेक्शनमध्येही अनेक रेकॉर्ड केले आहेत. ‘बाहुबली’ फेम एसएस राजमौली (SS Rajamouli) दिग्दर्शित या चित्रपट राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर Jr. NTR) मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपट चाहत्यांना आता हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करायची अजिबात गरज नाही. हा चित्रपट लवकर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


‘आरआरआर’ हा चित्रपट येत्या 20 मेला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी 5’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिजिटल रिलीजमुळे प्रेक्षकांना घर बसल्या या चित्रपटाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूप खुश झाले आहेत. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट Zee 5 सर्व दक्षिणात्य भाषांमध्ये प्रीमियर होईल, त्याच दिवशी RRRचे हिंदी व्हर्जन Netflix वर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. योगायोगाने, 20 मे हा ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस देखील आहे.


पाहा नवा टीझर :



बिग बजेट चित्रपट


तेलुगु पीरियड ड्रामा ‘RRR’ ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला.‘RRR’ हा खर्चाच्या दृष्टीने देखील मोठा चित्रपट आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनेकवेळा उशीर झाला होता, ज्यामुळे चित्रपटाच्या बजेटवर देखील वाईट परिणाम झाला. मात्र, एसएस राजामौली यांनी केवळ खर्चाची परतफेड केली नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदार आणि भागीदाराने या चित्रपटातून पैसे कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही ‘RRR’ ची क्रेझ अद्याप थांबली नाहीये.


हेही वाचा :