Amitabh Bachchan Worst Movie : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांचा पहिला सुपरहिट चित्रपट 'जंजीर' 1973 मध्ये आला. या सिनेमानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट तर काही फ्लॉप चित्रपट दिले. बिग बींचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अमिताभ बच्चन यांचे सलग चित्रपट फ्लॉप ठरलेले आहेत. 1997 मध्ये आलेला बिग बींचा एक चित्रपट त्यांच्या करिअरमधला सर्वात वाईट चित्रपट होता. 


अमिताभ बच्चन 1997 मध्ये आलेल्या 'मृत्यूदाता' या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाते ते अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसले होते. सिनेमातील अमिताभ आणि डिंपल यांचा रोमान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. 


अमिताभ बच्चन यांचा सुपरफ्लॉप चित्रपट 'मृत्यूदाता'


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 1995 मध्ये कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीअंतर्गत निर्मिती करण्यात आलेले अनेक चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले. या कंपनीने पुढे अनेक शेअर्स खरेदी केले पण हाती काहीही यश आलं नाही. अखेर पाच-सहा वर्षांत ही कंपनी बंद करावी लागली. याच प्रोडक्शन कंपनीअंतर्गत निर्मिती करण्यात आलेला अमिताभ बच्चन यांचा 'मृत्यूदाता' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. 


'मृत्यूदाता'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Mrityudaata Box Office Collection)


बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार,  मृत्यूदाता या सिनेमाची निर्मिती 17 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली हे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 12 ते 13 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. या सिनेमातील एक गाणं फक्त सुपरहिट झालं होतं. अमिताभ बच्चन आणि दलेर मेहंदी यांनी हे गाणं गायलं होतं. 'ना ना ना ना रे' असे या गाण्याचे बोल होते. 


'मृत्यूदाता' या सिनेमाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी केली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह करिश्मा कपूर, प्राण, डिंपल कपाडिया, परेश रावल, अरबाज अली खान, मुकेश ऋषी, मुस्ताक खान, दीपक तिजोरी, फरीदा जलाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. अमिताभ बच्चन यांचे 1990 ते 1999 याकाळात अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. 25 मे 1997 रोजी मृत्यूदाता हा सिनेमा रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन त्यावेळी एका मुलाखतीत म्हणाले होते की,"मृत्यूदाता' हा माझा चित्रपट फ्लॉप झाला तो फक्त माझ्या चुकीमुळे. जया माझ्या सिनेमांची सर्वात मोठी क्रिटिक आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान सगळ्यात आधी ती उठून निघून गेली होती. तेव्हाच हा सिनेमा चालणार नाही, असं मला वाटलं होतं". 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan First Love : रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल