Manoj Tiwari: भोजपूरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, गायक आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत. नुकताच मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभी (Surbhi Tiwari) यांच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन सुरभी आणि मनोज यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'काही वेळा आनंद हा आपण शब्दांमध्ये मांडू शकत नाही. फक्त आपण फक्त तो अनुभवू शकतो.' या व्हिडीओला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी मनोज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सुरभी या रेड कलरचा ट्रेडिशनल आऊटफिट आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
मनोज तिवारी यांनी दोनवेळा संसार थाटला. त्यांचे पहिले लग्न हे राणी यांच्यासोबत 1999 मध्ये झाले. लग्नानंतर 13 वर्षांनी मनोज आणि राणी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मनोज आणि राणी यांना जिया नावाची मुलगी आहे. जिया ही तिच्या आईसोबत मुंबईमध्ये राहते. मनोज यांनी 2020 मध्ये सुरभी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सुरभी आणि मनोज यांना एक मुलगी आहे. आता सुरभी आणि मनोज यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मनोज तिवारी यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
अभिनेते खासदार मनोज तिवारींना कन्यारत्न, मुलीच्या जन्मानंतर म्हणाले 'जय जगदंब'