मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींनी आपल्या सुरेल स्वरांनी जगभरातील कानसेनांना तृप्त केलं. लतादीदींनी आतापर्यंत एकूण 20 हून अधिक भाषांमध्ये गायन केलं आहे. लता मंगेशकर अशा एकमेव व्यक्ती आहेत, ज्या हयात असताना त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो.

खरंतर लतादीदींच्या सर्वच गाण्यांनी जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आजही तेवढीच लोकप्रियता दीदींच्या गाण्यांना आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला लतादीदींची 'टॉप-10' गाणी एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणार आहोत.

लतादीदींची 'टॉप-10' गाणी