सलमानकडून 10 कोटींचं घर गिफ्ट, बिपाशाचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 08:34 AM (IST)
मुंबई : नुकतीच विवाहबंधनात अडकलेली बॉलिवू़ड अभिनेत्री बिपाशा बासू आणि सलमान खान यांचा घरोबा सर्वांनाच माहित आहे. याच मैत्रीतून सलमानने बिपाशाला 10 कोटींचं घर गिफ्ट केल्याच्या अफवा फेर धरु लागल्या. मात्र यावर चिडलेल्या बिपाशाने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. सलमान खानने आपल्याला कोणतंही घर गिफ्ट केलेलं नाही, असं बिपाशाने स्पष्ट केलं आहे. 'आतापर्यंत मी वाचलेली ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मी कधीतरी कोणाकडून अशाप्रकारचं गिफ्ट का घेईन?' असा संतप्त सवाल करत बिपाशाने चिडलेला इमोट आयकॉन पोस्ट केला आहे. https://twitter.com/bipsluvurself/status/743410662487924737 काही वर्षांच्या डेटिंगनंतर एप्रिल महिन्यात अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर बिपाशाने 'मी सलमानला घेऊन हनिमूनला जाणारे' असं मजेत म्हटलं होतं. मात्र दोघांमध्ये जवळीक असली तरी इतकं महागडं गिफ्ट आपण कधीच घेणार नाही, असं बिपाशाने स्पष्ट केलं आहे.