मुंबईः 'सैराट' चा सुपरस्टार आकाश ठोसर म्हणजेच परशा सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'फु' या सिनेमात काम करत आहे, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र या सिनेमात त्याची अभिनेत्री कोण असेल, याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

 

 

‘सैराट’ परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु

 



 

 

आकाशच्या चाहत्यांची ही उत्सुकता आता संपली आहे. आकाशसोबत या सिनेमात येक नंबर मालिकेतील अभिनेत्री माधुरी देसाई काम करणार असल्याची चर्चा आहे. माधुरी महेश मांजरेकर यांच्या 'फु' या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

 

 

PHOTO : सैराटपरशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुर

 

 

या सिनेमाच्या शुटींगला देखील सध्या सुरुवात झाली आहे. मात्र या सिनेमात परशाची आर्ची कोण असेल, याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. अखेर चाहत्यांची ही उत्सुकता आता संपली आहे.

 

कोण आहे माधुरी देसाई?

 

माधुरी देसाई ही येक नंबर या  झी मराठीवरील मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यात ही मालिका बंद झाल्यामुळे तिच्या चित्रपटसृष्टीतील आगमनाला तयार झाली आहे. या सिनेमाची कथा तरुणाईचं सध्याचं राहणीमान आणि त्यांच्या बोलीभाषेवर आधारित आहे. माधुरी या सिनेमात आकाशची अभिनेत्री म्हणून एका हटके भूमिकेत दिसणार आहे.