प्रेग्नंसीच्या चर्चेबाबत अखेर बिपाशानं मौन सोडलं!
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2016 02:40 PM (IST)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाला जवळजवळ ६ महिने उलटले आहेत. पण काही दिवसांपासून बिपाशा आणि करण अनेकदा हॉस्पिटलमध्ये दिसून आले. ज्यानंतर बिपाशा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर या सर्व चर्चानंतर आता खुद्द बिपाशानं याबाबत उत्तर दिलं आहे. सध्या तरी आपण प्रेग्नंट नसल्याचं तिने म्हटलं आहे. बिपाशनं एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'मी लोकांना अपील करते की, आमच्या जीवनातील हा सर्वात मोठा निर्णय आमच्यावर सोडा' प्रेग्नसीच्या चर्चेनं नाराज बिपाशा पुढे म्हणाली की, 'माझ्या प्रेग्नंसीची बातमी खोटी आहे. सध्या तरी असं काहीही नाही. मला कळत नाही अशा अफवा नेमकं पसरवतं तरी कोण?' बिपाशा मागील काही दिवसांपासून वायरल तापानं त्रस्त आहे. त्याची माहिती तिनं आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे.