मुंबई : ‘बाहुबली’ प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘बाहुबली 2’ च्या भरघोस यशानंतर आता प्रभासच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे बाहुबली कुणाशी लग्न करणार, ही चर्चा रंगणं आता स्वाभाविकच आहे. प्रभास पुढील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका वृत्तानुसार प्रभास एका उद्योजकाच्या नातीशी लग्न करणार आहे. रासी सिमेंटचे मालक भूपती राजू प्रभासच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे ‘इंडीयन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार प्रभासच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान काही वृत्तांनुसार प्रभासने तब्बल सहा हजार स्थळांना नकार दिलाय. कारण त्याला सिनेमावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. प्रभास सध्या अमेरिकेत सुट्ट्या एंजॉय करत आहे.
अमेरिकेहून परतल्यानंतर प्रभास त्याचा अपकमिंग सिनेमा ‘साहो’चं चित्रीकरण करणार आहे. या सिनेमाची निर्मीती सुजित रेड्डी करणार असून याचं बहुतांश चित्रीकरण मुंबईमध्ये होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.