BB OTT 2: बिग बॉस OTT 2 चा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडला. बिग बॉस OTT 2 (Bigg Boss OTT- 2) चा होस्ट सलमान खानने एल्विश यादवला या सीझनचा विजेता घोषित केले. अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) रिअॅलिटी शोचा फर्स्ट रनर अप तर मनिषा राणी ही या कार्यक्रमाची सेकंड रनर अप ठरली. अभिषेक उर्फ फुकरा इन्सान हा ग्रँड फिनाले एपिसोड दरम्यान आजारी पडला होता. आता शो संपल्यानंतर अभिषेक मल्हानने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिषेक मल्हानन चाहत्यांचे आभार मानले.
बिग बॉस ओटीटी 2 चा उपविजेता अभिषेक हा डेंग्यूने ग्रस्त आहे. हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ शेअर करुन अभिषेक म्हणाला की, 'मी ट्रॉफी घरी आणू शकलो नाही. पण ज्या लोकांनी मला सपोर्ट केला, प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो'
अभिषेकनं व्हिडीओ शेअर केल्यानंतर अभिषेकच्या चाहत्यांनी कमेंट करुन त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. एका यूजरने कमेंट केली की, "भाई लवकर बरा व्हा." दुसर्या यूजरने लिहिले, "तू ट्रॉफी नाही तर हृदय जिंकले आहे, भाऊ. लवकर बरा हो."
पाहा व्हिडीओ:
बिग बॉस OTT 2 मधील स्पर्धक
बिग बॉस OTT 2 ची सुरुवात अभिषेक मल्हान, मनिषा राणी, बाबिका ध्रुवे, पूजा भट्ट, अविनाश सचदेव, फलक नाझ, जिया शंकर, सायरस ब्रोचा, पलक पुरस्वानी, आकांक्षा पुरी, आलिया सिद्दीकी आणि पुनित सुपरस्टार या स्पर्धकांसह झाली होते. त्यानंतर चार आठवड्यांनंतर, शोच्या निर्मात्यांनी एल्विश यादव आणि आशिका भाटिया यांना वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश दिला. रिअॅलिटी शो जिंकणारा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक बनून यादवने इतिहास रचला, तर भाटियाला दोन आठवड्यांनंतर घरातून काढून टाकण्यात आले.
'बिग बॉस ओटीटी 2'च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट या पाच स्पर्धकांचा समावेश होता.
संबंधित बातम्या