Subhedar Movie Released Date : 'सुभेदार' (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


तांत्रिक अडचणींमुळे 'सुभेदार'ची रिलीज डेट ढकलली पुढे


'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचं जाहीर करत 'सुभेदार'च्या टीमने लिहिलं आहे,"जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार... छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणा सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत". 






कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणारा काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करुन श्री. शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प 'सुभेदार' दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे राहाल ही खात्री आहे. हर हर महादेव!". 


चिन्मय मांडलेकरने 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं...! आम्हीही शिवरायांचे मावळे आहोत, अडचणींवर मात करणार आणि 25 ऑगस्टला तुमच्या भेटीस नक्की येणार". चिन्मयच्या या पोस्टवर दादा काही अडचण नाही...आमची उत्सुकता आणखी शिगेला पोहचणार, सदैव पाठीशी.. जय शिवराय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.


'सुभेदार' कधी होणार रिलीज? (Subhedar Released Date)


'सुभेदार' हा सिनेमा आधी 25 ऑगस्टलाच प्रदर्शित होणार होता. पण प्रेक्षकांच्या आग्रहातर हा सिनेमा लवकर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. पण आता तात्रिंक कारणांमुळे 'सुभेदार' हा सिनेमा आधी ठरलेल्या वेळीच 25 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस सिनेमाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


'सुभेदार' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरला अल्पावधीतच चांगले व्ह्यूज मिळाले होते. 'आले मराठे' आणि 'मावळ जागं झालं रं' ही सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ सिनेमाची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


सुभेदार तान्हाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेच स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा  दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, विराजस कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


Subhedar : गड आला पण... दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट