BB OTT 2: 'बिग बॉस ओटीटी'चा (Bigg boss ott 2) दुसरा सीझन  17 जूनपासून जिओ सिनेमावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) देखील स्पर्धक म्हणून सहभाही झाली आहे. आलिया आणि नवाजुद्दीन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मतभेदांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. आता आलिया ही बिग बॉसच्या घरात नवाजुद्दीनबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणते गौप्यस्फोट करणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


बिग बॉसच्या घरात एन्टी केल्यापासून आलिया खूपच शांत दिसली. या सगळ्या दरम्यान, तिसऱ्या दिवशी तिनं आलियानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल  आणि नवाजुद्दीनसोबतच्या नात्याबद्दल, घरातील स्पर्धकांना सांगितलं.


बिग बॉस OTT 2 च्या एका एपिसोडमध्ये,आलिया ही  नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल बोलताना दिसणार आहे. जेव्हा सायरस ब्रोचाने तिला याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितलं, “मी 2003 मध्ये नवाजुद्दीनला भेटली होती. माझा भाऊ नवाजुद्दीनचा असिस्टंट होता. त्यानंतर तो एकता नगरमध्ये राहायला गेला.मी पीजीमध्ये राहत होतो आणि मला हाकलून देण्यात आले होते. त्यादरम्यान त्याच्या भावाने मला तेथे काही दिवस राहण्यास सांगितले'


'मी तिथे कम्फर्टेबल नव्हते. मी त्याचा फोटो पहिले आणि मला त्याचे डोळे आवडले. मग आम्ही भेटलो आणि प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही एकत्र राहू लागलो. हा आमचा प्रवास झाला आहे.'


त्यानंतर सायरसने आलियाला तिच्या आयुष्यातील दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचारले. यावर आलियानं उत्तर दिले, 'ती व्यक्ती इटालियन आहे आणि  खूप सुंदर आहे. यात शंका नाही. माझ्या एका मैत्रिणीला तो आवडत होता. त्यावेळी आमच्यात काहीच नव्हते. तो मला म्हणाला की, त्याला माझे डोळे आवडतात आणि मग आम्ही बोलू लागलो. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो आदर करतो आणि प्रेम करतो.  म्हणूनच मी 19 वर्षांनी उघडपणे या नात्यात आले.मी घाबरले नाही.'



सायरसने तिला पुढे आलियाला विचारले की तिचा लग्न करायचा काही प्लॅन आहे का? यावर आलिया म्हणाली, "नाही यार. मी या जन्मी लग्न करणार नाही. आता माझा लग्नावरील विश्वास उडाला आहे."


इतर महत्वाच्या बातम्या:


Pooja Bhatt: वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्री पूजा भट्टनं सोडली दारु; बिग बॉसच्या घरात म्हणाली...