Sreejita De Wedding : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री, 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) फेम श्रीजिता डे (Sreejita De) लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. 


श्रीजिताने स्वत:चं लग्नसोहळ्याबद्दल (Sreejita De Wedding) चाहत्यांना माहिती दिली आहे. अनेक दिवसांपासून ती जर्मनमध्ये राहणाऱ्या मायकल ब्लोम पेपला डेट करत आहे. श्रीजिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रीजिता म्हणत आहे की, माझा वेडिंग गाऊन तयार असून येत्या 1 जुलैला मी लग्न करणार आहे". श्रीजिताच्या लग्नसोहळ्याच्या घोषणेने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते श्रीजिताला शुभेच्छा देत आहेत.






जर्मनी रीती-रिवाजानुसार श्रीजिता आणि मायकलचं लग्न होणार आहे. जर्मनीमधील हॅम्बर्गमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर गोव्यात बंगाली रीती-रिवाजानुसार त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. श्रीजिता आणि मायकल हनीमूनला मालदीवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. श्रीजिताने लग्नाची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  


श्रीजिता-मायकल 1 जुलैला अडकणार लग्नबंधनात


श्रीजिता आणि मायकल 2021 मध्ये लग्न करणार होते. पण वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. अखेर 1 जुलै 2023 रोजी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्याला श्रीजिताच्या खास मैत्रिणी शालीन भनोट आणि प्रियंका चाहर चौधरीदेखील उपस्थित राहणार आहेत.


श्रीजिता डे कोण आहे? (Who Is Sreejita De)


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत श्रीजिता डेची गणना होते. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'उतरन', 'कसौटी जिंदगी के', 'पिया रंगरेज', नजर, 'लाल इश्क' आणि 'ये जादू है जिन का' सारख्या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. मालिकांसह 'टशन', 'लव्ह का द एन्ड' आणि 'रेस्क्यू' सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. 'बिग बॉस 16'मुळे श्रीजिताच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. 


संबंधित बातम्या


PHOTO : नव्या सीझनचं पहिलं एलिमिनेशन; श्रीजिता डे ‘बिग बॉस 16’मधून आऊट!