मुंबई : बिग बॉसचे 18 वे सिझन (Bigg Boss 18 Season) नुकतेच संपले. यावेळचा बिग बॉस शो अनेक अर्थांनी खास होता. या पर्वाचा विजेता अभिनेता करण वीर मेहरा (Karan Veer Mehra) ठरला आहे. त्याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं असून त्याला बक्षीस म्हणून तब्बल 50 लाख रुपये मिळाले आहेत. दरम्यान, याच 18 व्या सिझनचा भाग असलेली अभिनेत्री यामिनी मल्होत्रा (Yamini Malhotra) मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती राहण्यासाठी घर शोधत आहे. मात्र अजूनही तिला घर मिळालेलं नाही. त्यामुळेच तिने आपला संताप व्यक्त केला आहे. घर भाड्याने देताना तिला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळेही ती चांगलीच आश्चर्यचकित झाली आहे.
वाईट अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला
यामिनी मल्होत्राने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी पोस्ट केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपला संताप व्यक्त केलाय. इंग्रजी भाषेत तिने ही पोस्ट टाकली आहे. ती मुंबईमध्ये राहण्यासाठी चांगले घर शोधत आहे. मात्र घर भाड्याने देताना तिला तिच्या धर्माबद्दल विचारले जात आहे. सोबतच ती कोणत्या समाजाची आहे, असंही विचारलं जातंय. हाच अनुभव तिने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.
तिला नेमकं काय विचारलं जातंय?
यामिनी मल्होत्राने मुंबईत अनेक ठिकाणी घरासाठी चौकशी केली आहे. पण तिला प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रस्न विचारण्यात आले. हाच अनुभव तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शब्दबद्ध केलाय. 'हॅलो मित्रांनो. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. ही गोष्ट फारच निराशाजनक आहे. मुंबई या शहरावर खूप प्रेम करते. पण या शहरात राहायला घर मिळणं फारच कठीण आहे. राहण्यासाठी घर मागायला गेल्यानंतर तुम्ही हिंदू आहात का? तुम्ही मुस्लीम आहात का? असे प्रश्न मला विचारण्यात आले. सोबतच तुम्ही गुजाराती आहात का, मारवाडी आहात का? असंही विचारण्यातआ आलं,' असं तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय.
चांगलीच भडकली यामिनी मल्होत्रा
सोबतच, मी एक अभिनेत्री असल्याचं समजलं की लोक मला लगेच घर देण्यास नकार देतात. एक अभिनेत्री असल्यामुळे मी घर मिळण्यास पात्र ठरत नाही का? 2025 सालात अशा प्रकारचे प्रश्न अस्तित्वात आहेत, हे पाहून मला धक्काच बसला हे. तुमच्या स्वपांना पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या अटी समोर ठेवल्या जात असतील तर मुंबईला स्वप्नांच शहर म्हणणं खरंच योग्य आहे का?' असंही तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
यामिनीने अनेक मालिकांत केलंय काम
दरम्यान, यामिनी मल्होत्रा यावेळी बिग बॉसच्या 18 व्या पर्वाची भाग होती. तिने हे सिझन चांगलेच गाजवले. सोबतच तिने याआधी 'गुम हैं किसी के प्यार में' और 'मैं तेरी तू मेरा' यासारख्या मालिकांत काम केलेले आहे.
हेही वाचा :
बहिणीचा नवरा घरी येताच करिष्माचा आनंद गगनात मावेना, सैफला सुखरुप पाहून केली खास पोस्ट!