Karisma Kapoor Reaction: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला. दरम्यान पाच दिवस उपचार घेऊन आता तो त्याच्या घरी परतला आहे. त्याला सध्या आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. सोबतच त्याला साधारण एक महिना जीम करता येणार नाही तसेच चित्रपटाच्या शूटिंगसाठीही जाता येणार नाही. मात्र सैफ अली खान परतल्यानंतर त्याच्या घरात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोबतच बहिणीचा नवरा घरी आल्याचे पाहून करिना कपूरची बहीम करिष्मा कपूरलाही आपला आनंद गगनात मावेना. तिने इन्स्टाग्रामवर भावना व्यक्त केल्या आहेत. तिने या पोस्टमधून एका प्रकारे तिच्या मनात नेमकं काय चाललंय हेच सांगितलं असल्याचं म्हटलं जातंय.
तीन शब्दांत करिष्माने केल्या भावना व्यक्त
सैफ अली खान 21 जानेवारी रोजी रुग्णालयातून परत आला आहे. घरी परतताना तो निळी जिन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसला. एखाद्या हिरोसाराखाच तो रुग्णालयातून बाहेर पडला. त्याने आपल्या चाहत्यांचे त्याने आभारही मानले. दरम्यान, करिनाचापती घरी आल्यानंतर करिष्मा कपूरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तीने अवघ्या तीन शब्दांची स्टोरी पोस्ट केली आहे. सोबतच काळ्या रंगाचा हार्ट इमोजीही तिने अपलोड केला आहे. आपल्या तीन शब्दांच्या पोस्टमध्ये तिने 'पॉझिटिव्ह वाईब्स ओन्ली' असं म्हटलंय. आता करिनाचा पती घरी सुखरुप आला आहे, त्यामुळे आता फक्त सकारात्मक गोष्टी हव्यात, असंच जणून करिष्माने म्हटलं आहे, असं सांगितलं जातंय.
करिष्मा आणि सैफ अली खान यांच्यात चांगला बॉण्ड
करिना कपूरचे कुटुंब तसेच करिष्मा कपूर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र जमतात. सैफ अली खान आणि किरष्मा कपूर यांच्यात चांगला बॉण्ड आहे. ते एकमेकांसोबत गप्पा, मस्ती करताना अनेकवेळा दिसलेले आहेत. सैफ अली खानवर चाकूहल्ला झाल्यानंतर करिष्मा कपूर करिना कपूरच्या मदतीला धावली होती.
करिना कपूर चांगलीच भडकली होती
याआधी सैफ अली खानवर उपचार चालू असताना करिना कपूर मात्र पापाराझींवर चांगलीच भडकली होती. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. कृपा करून आम्हाला एकटं सोडा. हे सगळं थांबवा असं तिने म्हटलं होतं. ही स्टोरी अपलोड करून पुढच्याच काही मिनिटांत तिने ही स्टोरी डिलिट केली होती.
आरोपीला अटक, चौकशी चालू
दरम्यान, सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळाला आहे. घरात येताच सैफचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्या घरावर रोषणाई करण्यात आली होती. त्याच्या पाठीत चाकूचा तुकडा होता. शस्त्रक्रिया करून तो काढण्यात आला. तर दुसरीकडे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो सध्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तो मुळचा बांगलादेशचा नागरिक असल्याचं म्हटलं जातंय. तो अवैधपणे भारतात घुसल्याचंही सांगण्यात येतंय.
हेही वाचा :
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न