Saif Ali Khan Attacked: सैफसाठी 'हा' देवदूतच ठरला; डिस्चार्जनंतर सैफ सगळ्यात आधी संकटात धावून आलेल्या रिक्षाचालकाला भेटला
सैफ अली खानला डिस्चार्ज दिल्यानंतर सर्वात आधी तो संकटात धावून आलेल्या रिक्षाचालकाला भेटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ अली खान आणि भजन सिंह राणा यांची भेट लीलावती रुग्णालयातच झाल्याची माहिती मिळत आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफ अली खाननं रिक्षाचालक भजन सिंह राणाला रुग्णालयातच बोलावून घेतलं.
त्यानंतर सैफ अली खान आणि त्याची आई दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी रिक्षा चालकाचे आभार मानले.
त्यानंतर सैफ अली खाननं रिक्षाचालकाचा सत्कार केला आणि अशीच सर्वांची मदत करण्याचा सल्लाही दिला.
तसेच, सैफला भजन सिंह राणानं ज्या दिवशी जखमी अवस्थेत रुग्णलयात दाखल केलेलं होतं, त्यादिवशीचं रिक्षाचं भाडं दिलं नव्हतं, ते तुला नक्की मिळेल असं आश्वासनही दिलं होतं.
तसेच, आयुष्यात कधीही, कसलीही मदत लागली तर माझी आठवण नक्की काढ, मी मदतीसाठी तप्तर असीन, असा शब्दही सैफनं भजन सिंह राणाला दिला.
भजन सिंह राणाला विचारलं की, रुग्णालयात कुणालच कळू न देता कशी भेट घेतली? तर, त्यावेळी त्यानं सांगितलं की, मी तोंडाला मास्क लावून गेलो होतो.