Bigg Boss 16 Winner MC Stan Post : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या बहुचर्चित कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून यात एमसी स्टॅनने (MC Stan) बाजी मारली आहे. विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅन म्हणाला,"आईचं स्वप्न अखेर पूर्ण केलं". 


एमसी स्टॅनने 'बिग बॉस 16'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. एमसी स्टॅनने भाईजान सलमान खानसोबतचा (Salman Khan) फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"आम्ही इतिहास रचला आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर खरं वागण्याचा आणि राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. 'बिग बॉस 16'चा विजेता होण्याचं आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. स्टॅन तुमचाच आहे". 






एमसी स्टॅनच्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनंदन भावा, बिग बॉसच्या ट्रॉफीवर तुझाच हक्क, अखेर मंडलीकडेच बिग बॉसची ट्रॉफी आली, आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत, खूप खूप प्रेम, आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


एमसी स्टॅनबद्दल जाणून घ्या...


पुण्यातील ताडीवाला रोडवर राहणाऱ्या एमसी स्टॅनचा जन्म एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला आहे. तो कायम आपल्या हटके डायलॉग आणि अतरंगी राहणीमानामुळे चर्चेत असतो. तो रॅपर असण्यासोबत हिप-हॉप गायकदेखील आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आता बिग बॉसचा विजेता झाल्यामुळे जगभरातील चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याचे वडील रेल्वेमध्ये हवालदार होते. तर आई गृहिणी आहे. सध्या एमसी स्टॅन मुंबईत राहतो. पण तो 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16 Winner MC Stan) विजेता झाल्यानंतर पुण्यातील ताडीवाला रोडवर जल्लोष करण्यात आला आहे. 


एमसी स्टॅन बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी, 31 लाख 80 हजार रक्कम आणि Hyundai Grand i10 Nios ही गाडी बक्षीस म्हणून मिळाली आहे. एमसी स्टॅनच्या भांडणाने, वादाने 'बिग बॉस'चा टीआरपी वाढला होता. आपल्या बोलीभाषेमुळे तो कायम चर्चेत आला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी एमसी स्टॅनने आपल्या खेळीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच तो सर्वांचा लाडका बनला आहे. 


संबंधित बातम्या


MC Stan :'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे? जाणून घ्या रॅपरच्या संघर्षाची कहाणी...