Bhumi Pednekar Weight Loss Journey : भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) दम लगा के हैशा (Dum Laga Ke Haisha) या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत दिसली होती. या चित्रपटात दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या. पण ही भूमिका भूमी पेडणेकरसाठी सोपी नव्हती. कारण या चित्रपटातील भूमिचा रोल हा अतिशय जाड मुलीचा होता. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी भूमीला 90 किलो वजन वाढवावं लागलं आणि तिने ते केलंही. आजही 'दम लगा के हैशा'ची गणना देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये केली जाते. मात्र, चित्रपट संपल्यानंतर भूमी पेडणेकरसाठी वजन कमी करण्याचे आव्हान होते.
वजन कमी करण्यासाठी भूमीचं स्पेशल डाएट :
दम लगा के हैशा चित्रपटाच्या दरम्यान भूमी पेडणेकरचं वजन 90 किलो होतं. मात्र, चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर भूमीला पुन्हा त्याच शेपमध्ये येणं गरजेचं होतं आणि ते कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं. भूमीला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पण खास गोष्ट म्हणजे भूमी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिली नाही, तर तिने खास डाएट प्लॅन फॉलो केला. भूमीने त्यावेळी साखर आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंपासून अंतर ठेवून केवळ पौष्टिक घरगुती अन्न खाणं पसंत केलं. तसेच,आहारात फक्त अशाच गोष्टींचा समावेश केला, ज्यामुळे तिला फॅट्स न मिळता त्यातून जास्त ऊर्जा मिळेल.
चार महिन्या 32 किलो वजन कमी केले :
रिपोर्ट्सनुसार, भूमी पेडणेकरने 4 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर 32 किलो वजन कमी केले होते आणि ती हळूहळू परफेक्ट फॉर्ममध्ये आली होती. भूमीचं हे बदलतं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले होते. दम लगा के हैशा नंतर भूमीच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्यानंतर भूमीने सांड की आंख, दुर्गामती, बाला, पती पत्नी और वो अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका केली. आता तिचा बधाई 2 प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : कधीकाळी बेरोजगार असणारा 'जेठालाल' आज आहे इतक्या संपत्तीचा मालक
- Kapil Sharma : नेटफ्लिक्सच्या 'कॉमेडी शो' चं नाव असं ठरलं; कपिलनं सांगितला किस्सा
- Happy Birthday Jackie Shroff : कधीकाळी चाळीत राहायचा जॅकी श्रॉफ, ‘अशी’ मिळाली मॉडेलिंगची ऑफर!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha