Bhool Bhulaiyaa 3 OTT Release: कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) या हॉरर-कॉमेडी (Horror Comedy) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुरळा उडवला. या फ्रँचायझिच्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. भूल भुलैया 3 अजूनही थिएटरमध्ये आहे. विशेष म्हणजे, अजय देवगणचा मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले. पण एकटा कार्तिक आर्यन सिंघम अगेनच्या सर्वच्या सर्व स्टार कास्टवर भारी पडला. कार्तिक आर्यननं सिंघम अगेनला मागे टाकून 250 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. महिनाभर चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता कार्तिकचा भूल भुलैया 3 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Continues below advertisement

भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, तर माधुरी दीक्षितचा चित्रपटात कॅमिओ आहे. या चित्रपटात प्रत्येकानं आपल्या अभिनयानं चाहत्यांना प्रभावित केलं आहे. सगळेच त्याच्या अभिनयाचं कौतुक करून थांबत नाहीत.              

'भूल भुलैया 3' OTT प्लॅटफॉर्मवर कधी येणार? 

'भूल भुलैया 3' च्या ओटीटी रिलीजबद्दल बोलायचं तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 27 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटगृहांनंतर, सगळेजण OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. नव्या वर्षात चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.                                                       

Continues below advertisement

सिंघम अगेनला भूल भुलैय्या 3 नं पछाडलं 

सिंघम अगेन हा चित्रपट भूल भुलैया 3 सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकांना वाटलं होतं की, अजय देवगणचा चित्रपट कार्तिक आर्यनला सहज मागे टाकेल, पण तसं झालं नाही, त्याऐवजी कार्तिकनं जबरदस्त कलेक्शन करून सगळ्यांचा धुव्वा उडवला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता कार्तिक आर्यन ओटीटीवर धुमाकूळ घालणार आहे.                                                    

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही