Bhool bhulaiyaa 3 Kartik Aaryan :  कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) मुख्य भूमिका असलेला 'भुलभूलैया 2'  (Bhool bhulaiyaa 2) बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला. त्यानंतर प्रेक्षकांना 'भुलभूलैया 3' (Bhool bhulaiyaa 3) प्रतिक्षा लागली आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आणखी कोणते कलाकार असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील कास्टिंगबाबत आता आणखी  एक मोठी अपडेट समोर आली आहे. कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक कोडं घालत लोकांना अभिनेत्रीचे नाव विचारले आहे. 


अक्षय कुमारची मु्ख्य भूमिका असलेला भुलभूलैया या चित्रपटातील मूळची मंजुलिका विद्या बालन ही भुलभूलैयाच्या सीरिजच्या तिसऱ्या चित्रपटात पुनरागमन करत असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आणखी एका वृत्तात धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित ही देखील भुलभूलैया 3 मध्ये झळकणार असल्याचे म्हटले गेले. आता  कार्तिक आर्यनने  या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीबद्दल एक मोठी हिंट दिली. 


तृप्ती डिमरी 'भूल भुलैया 3' मध्ये ?


कार्तिक आर्यनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक  पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एका अभिनेत्रीचे अर्धे चित्र आहे, ज्यामध्ये तिचा अर्धा हसरा चेहरा दिसतो. कॅपश्नमध्ये भुलभूलैयाचे कोडं सोडवण्याचे आवाहनही कार्तिकने केले. 






कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या फोटोमधील अभिनेत्री ही तृप्ती डिमरी असल्याची चर्चा सुरू आहे. कार्तिकच्या पोस्टवर कमेंट करताना बहुतांश सोशल मीडिया युजर्सनीही ती तृप्ती असल्याचे ठाम मत व्यक्त केले आहे. तृप्तीने 2022 मध्ये सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. कार्तिकने शेअर केलेला फोटो हा तृप्तीचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे. 






 


'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिकसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. 'भूल भुलैया 3' संदर्भात कियाराच्या नावाची अद्याप पुष्टी झालेली नाही, त्यामुळे कदाचित निर्मात्यांनी नवीन कथेत कियाराची जागा घेतली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.


'आशिकी 3'मध्येही कार्तिक-तृप्ती एकत्र?


कार्तिकच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये अनुराग बसू दिग्दर्शित 'आशिकी 2' चा सिक्वेल देखील आहे. 'आशिकी 3'चे निर्माते कार्तिक आर्यनसोबत नवीन नॅशनल क्रश तृप्ती डिमरी या चित्रपटात कास्ट करू इच्छितात अशी बातमी समोर आली होती. त्यावर  कार्तिकने म्हटले की, तृप्तीला चित्रपटात घ्यायचे की नाही हे निर्माते ठरवतील. पण जर तृप्ती या चित्रपटात त्याच्यासोबत आली तर प्रेक्षकांनाही एक फ्रेश जोडी पडद्यावर पाहायला मिळेल.  रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' चित्रपटात दिसलेली तृप्ती डिमरी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील तिची रणबीरसोबतची केमिस्ट्री खूप चर्चेत होती.