Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ‘भूल भुलैया २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन आता 20 दिवस झाले आहेत. या 20 दिवसांत कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने अनेक विक्रमही रचले आहेत. ‘भूल भुलैया 2’ने आता 161 कोटींची कमाई केली आहे. ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांना तगडी टक्कर दिली आहे.


‘भूल भुलैया 2’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने आतापर्यंत 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने तिसर्‍या आठवड्याच्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘भूल भुलैया 2’ने पहिल्याच आठवड्यात 90.78 कोटींची कमाई केली होती. ही कमाई अपेक्षेपेक्षा खूप चांगली होती. त्याचवेळी या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही तब्बल 49.23 कोटींची कमाई केली.


तिसऱ्या आठड्यातही धमाकेदार कमाई


यानंतर, ‘भूल भुलैया 2’ने तिसऱ्या आठवड्याच्या वीकेंडला 16.75 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाने तीन आठवड्यांत एकूण 161 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याशिवाय 'भूल भुलैया 2' या चित्रपटानेही अनेक विक्रम केले आहेत. ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट गेल्या महिन्यात 20 तारखेला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट 10 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा होती. परंतु, ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने तब्बल 14 कोटींचा गल्ला जमवला होता.


‘या’ कलाकारांनी साकारली मुख्य भूमिका


'भूल भुलैया 2' या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीसोबत तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. ‘भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा ‘रूह बाबा’ ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर, कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :


Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैय्या-2' नं 100 कोटी क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं?


Kartik Aaryan : शाहरुख नाही आता कार्तिक आहे बॉलिवूडचा किंग? कार्तिक म्हणाला, 'किंग नाही तर...'