Kartik Aaryan : गेली अनेक वर्ष अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जातोय. त्याचे चाहते त्याला किंग किंवा बादशाह म्हणतात. पण आता भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) च्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) चाहते त्याला बॉलिवूडचा किंग म्हणत आहेत. या सर्व गोष्टीवर आता कार्कितनं प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सध्या कार्तिकच्या भूल भुलैय्या-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडचा किंग कार्तिक आहे, असं चाहते म्हणत आहेत. कार्तिकनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. किंग नाही तर प्रिन्स म्हणलं तर जास्त आवडेल.' त्याच्या या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
कार्तिकचे आगामी चित्रपट
'सोनू के टीटू की स्वीटी', 'प्यार का पंचनामा 2', 'भूल भुलैया 2', 'पति पत्नी और वो' आणि 'धमाका' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे काही आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'सत्यनारायण की कथा' आणि 'कॅप्टन इंडिया' हे कार्तिकचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
भूल भुलैय्या-2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 23.51 कोटींची कमाई केली. सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.75 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटानं 9.56 कोटींची कमाई करुन 76.27 कोटींचा टप्पा गाठला.
हेही वाचा: