OTT Release Date:  ओटीटी प्लेटफॉर्मवरील (OTT Platform) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांची पसंती मिळते. वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.  अभिनेता वरुण धवन  (Varun Dhawan)  आणि अभिनेत्री  क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा 'भेडिया' (Bhediya) गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही.  हा चित्रपट प्रदर्शित होऊन 4 महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत, मात्र हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झालेला नाही. हा  चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


भेडिया या चित्रपटाप्रमाणेच प्रेक्षक हृतिक रोशन (Hrithik Roshan), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राधिका आपटे (Radhika Apte) यांच्या 'विक्रम वेधा' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची  देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'विक्रम वेधा' गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले कलेक्शन करू शकला नाही.


प्रेक्षक जिओ सिनेमा या प्लॅटफॉर्मवर वरुण धवन आणि क्रितीसेनन यांचा 'भेडिया' हा चित्रपट पाहू शकणार आहेत. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी जिओ सिनेमाच्या अॅपवर प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत निर्माते लवकरच  घोषणा करू शकतात, असं म्हटलं जात आहे. 






हृतिक रोशन, सैफ अली खान आणि राधिका आपटे यांचा विक्रम वेधा देखील जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे.एका रिपोर्टनुसार, 'विक्रम वेधा' 8 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Netflix Crime Web Series: क्राईम थ्रिलर वेब सीरीज बघायला आवडतात? नेटफ्लिक्सवरील 'या' सीरीज नक्की पाहा