Ghe Double : जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित 'घे डबल' (Ghe Double) या सिनेमाचे भन्नाट टीझर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात झळकणाऱ्या या सिनेमात भाऊ कदम (Bhau Kadam) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.


'घे डबल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विश्वास जोशी यांनी सांभाळली आहे. ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज या सिनेमाचे निर्माते आहेत. रुपेरी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे मुख्य आकर्षण कॉमेडी स्टार भाऊ कदमची दुहेरी भूमिका आहे. 


सिनेमाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात,"जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच 'घे डबल' हा विनोदी सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक सिनेमा असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार."


'घे डबल' 30 सप्टेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'घे डबल' या सिनेमाचे टीझर पोस्टर भाऊ कदमने सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे, धम्माल एंटरटेनमेंटचा डब्बल बार, सर्व टेंशनवर करणार डब्बल वार! तुम्हाला खळखळून हसवायला घेऊन येत आहोत भाऊ कदमच्या कॉमेडीचा डब्बल धमाका...'घे डबल' 30 सप्टेंबरपासून सर्व चित्रपटगृहांत". 'घे डबल' या सिनेमाचे टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 






संंबंधित बातम्या


Samaira : अनन्यसाधारण 'समयरा'च्या प्रवासाची झलक; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


Movie Release This Week : 'शाबास मिथु' ते 'दगडी चाळ 2'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी