Bharti Singh Baby Name : गोला नाही तर लक्ष्य, मुलाच्या नावाचा भारती सिंहने केला खुलासा

Bharti Singh Baby Name : विनोदवीर भारती सिंहच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे.

Continues below advertisement

Bharti Singh Baby Name : विनोदवीर भारती सिंह (Bharti Singh) नेहमीच तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. भारती आणि हर्ष लिंबाचिया  (Haarsh Limbachiyaa) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. अद्याप भारतीने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नसला तरी मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. 

Continues below advertisement

भारती सिंहने केला मुलाच्या नावाचा खुलासा

छोट्या पडद्यावरील विनोदवीर भारती सिंह तिच्या मुलाला प्रेमाने 'गोला' अशी हाक मारते. पण ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार भारतीने तिच्या मुलाचे नाव लक्ष्य (Lakshya) असे ठेवले आहे. एका व्हिडीओमध्ये भारती म्हणाली आहे, लक्ष्याच्या जन्माआधीपासूनच मी काम करत आहे.  त्यामुळेच भारतीने मुलाचे नाव लक्ष्य ठेवले, असे म्हटले जात आहे. 

भारती सिंह 2017 साली हर्ष लिंबाचियासोबत लग्नबंधनात अडकली आहे. गोव्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. भारतीच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. अद्याप भारतीने तिच्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. लवकरच भारती लक्ष्यच्या नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. 

भारती सिंहने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. भारतीने यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करत गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

संबंधित बातम्या

Bharti Singh : भारतीच्या लेकाचं गंमतीशीर नाव! अर्थ सांगताना म्हणाली..

Bharti Singh : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने चाहत्यांना दाखवली लेकाची पहिली झलक, फोटो शेअर करत म्हणाली...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola