मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता हा सिनेमा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी संजय लीला भन्साळी यातील काही दृश्यांवर कात्री चालवणार आहेत.


सिनेमाचं ड्युरेशन जास्त झाल्यामुळे यातील दृश्यांवर कात्री चालवली जाणार आहे. फायनल कटनंतर सिनेमा 210 मिनिटांचा तयार झाला. त्यानंतर ड्युरेशन जास्त होत असल्याचं लक्षात आलं. भन्साळी यांच्या टीमची चर्चा झाल्यानंतर ड्युरेशन कमी करण्यासाठी काही दृश्यांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सिनेमात तीन मोठे स्टार काम करत आहेत. त्यामुळे दश्य हटवताना भन्साळी यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. रणवीर सिंह, शहीद कपूर आणि दीपिका पदुकोण यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे.

या सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्याची मोठी चर्चा झाली. 1 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होईल. सिनेमाच्या शुटिंगपासूनच भन्साळी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या सिनेमाला विरोध करण्यात आल्यामुळे सेटचीही तोडफोड करण्यात आली होती.
'पद्मावती'मधील 'घुमर' गाणं रीलिज, दीपिकाचा अनोखा अंदाज