मुंबई : आत्मचरित्रातून खाजगी आयुष्य उघड करताना अनेक तरुणींवर शिंतोडे उडवणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीला अखेर उपरती आली आहे. काही जणींच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागत नवाझने आपलं पुस्तक मागे घेतलं आहे.

'अॅन ऑर्डिनरी लाइफ' या आत्मचरित्रात नवाझुद्दीननं अनेक गौप्यस्फोट केले होते. अभिनेत्री निहारिका सिंहसोबत शारीरिक संबंध आल्याचा दावा त्याने केला होता. त्याचप्रमाणे अनेक तरुणींसोबत कोणे एके काळी असलेल्या रिलेशनशीप त्याने चव्हाट्यावर आणल्या होत्या.

जुनं रिलेशनशीप उघड, निहारिका नवाझवर नाराज


निहारिकानंतर नवाझची पहिली गर्लफ्रेण्ड सुनिता राजवारनेही पुस्तकात खोटे दावे केल्याचा आरोप केला होता. महिलेला न विचारता तिचा उल्लेख पुस्तकात करणं चुकीचं असल्यानं आता नवाझुद्दीननं माफी मागितली आहे. ट्विटरवरुन नवाझने माफीनामा मागितला आहे.

https://twitter.com/Nawazuddin_S/status/924975058623324161
दिल्लीतील वकील गौतम गुलाटींनी नवाझविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तकार केली होती. नवाझुद्दीननं महिलेच्या चारित्र्याशी खेळ करत असल्याचा आरोप गुलाटींनी केला आहे. पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी त्यानं हा खटाटोप केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

आत्मचरित्राच्या निमित्ताने जुनं रिलेशनशीप उघड केल्यामुळे नवाझुद्दीनवर निहारिका सिंग रागवली होती. केवळ पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी महिलांचा अनादर करण्यातही नवाझ मागेपुढे पाहत नसल्याचा आरोप तिने केला होता.

निहारिका सिंग ही 2005 साली ‘फेमिना मिस इंडिया अर्थ’ किताबाची मानकरी ठरली होती. ‘मिस लव्हली’ चित्रपटातून तिने नवाझसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

आपलं नातं जगजाहीर करण्यापूर्वी संमती न घेतल्यामुळे निहारिका नाराज झाली होती. ज्याप्रकारे नवाझने माझी प्रतिमा रंगवली आहे, ते पाहता स्वतःच्या पुस्तकाचा खप व्हावा, म्हणून नवाझ महिलांचा अनादर करताना मागेपुढे पाहत नसल्याचं दिसत आहे, असं निहारिका म्हणाली होती.

नवाझुद्दीनने काय लिहिलं होतं?

मी पहिल्यांदाच निहारिकाच्या घरी गेलो. तिने दार उघडताच घराचा एक नजारा दिसला आणि मी भारावून गेलो. शंभर-एक मेणबत्त्या उजळल्या होत्या. तिने अंगावर फर घेतलं होतं. ती फारच गोड दिसत होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं.

मी धट्टाकट्टा असल्यामुळे तिला कवेत उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन गेलो. आम्ही अत्यंत आवेगाने प्रेमात बुडालो. अशाप्रकारे अनपेक्षितरित्या आम्ही रिलेशनशीपमध्ये अडकलो. आमचं रिलेशनशीप दीड वर्ष चाललं, असं नवाझने पुस्तकात लिहिलं होतं.