मुंबई : ग्लॅमरस अंदाज आणि बिंधास्त स्वभावामुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनम कपूरची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे. हीच ओळख बाजूला ठेवत सोनमने अनेक वेगळे सिनेमेही केले आहेत. ज्यामध्ये 'नीरजा', 'भाग मिल्खा भाग' यांचा समावेश आहे.

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये फीस घेतली होती, हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटेल. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार सोनमने सिनेमासाठी केवळ 11 रुपये घेतले होते. सोनमने या सिनेमात काम करावं, अशी सिनेमाचे दिग्दर्शक ओम प्रकाश मेहरा यांची इच्छा होती.

सोनमने 2013 साली आलेल्या भाग मिल्खा भाग सिनेमात निर्मल कौर यांची भूमिका साकारली होती.  अभिनेता फरहानने मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली.

या सिनेमाचं समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं. शिवाय प्रेक्षकांनीही सिनेमाला पसंती दिली होती. 2014 साली या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.