मुंबई: गेली काही वर्ष फेसबुकवर एक व्हिडीओ चांगलाच गाजतोय. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या अस्वलाच्या छोट्या पिल्लाचा जीवघेणा पाठलाग करताना दिसतो.


 

अनाथ, एकाकी, असहाय पिल्लू त्या निष्ठूर भुकेल्या बिबट्याचा कसा सामना करतं ते पाहताना काहींच्या डोळ्यात पाणी तर काहींच्या काळजाचा ठोका चुकल्यावाचून राहात नाही.

 

या व्हिडीओच्या लेटेस्ट क्लिपला महिन्याभरात 13 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत, तर 47 हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे.

 

निसर्गाचं वेगळं रुप, त्यातील हा विषम सामना नेमका चित्रित कसा केला असेल असा प्रश्न अनेकांना अजूनही पडतो.



 

खरंतर या व्हिडिओची क्लिप पहिल्यांदा 2007 साली यू ट्यूबवर अपलोड केली होती. गेल्या 9 वर्षात आतापर्यंत ही क्लिप तब्बल 4 कोटी 30 लाख लोकांनी पाहिली आहे.



ही इमोशनल क्लिप कशी चित्रित केली याचा उलगडा

 

हा सीन The Bear नावाच्या फ्रेंच सिनेमातील क्लायमॅक्सचा सीन आहे (मूळ नाव known as L'Ours in its original release) याची क्वालिटी, तंत्र पाहून विश्वास बसत नाही पण आजपासून तब्बल 28 वर्षांपूर्वी म्हणजे 1988 साली हा चित्रपट आला होता.

 

पर्वतरांगांमध्ये खडक कोसळून झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाल्यानं पोरकं झालेलं अस्वलाचं एक पिल्लू, आईच्या सुरक्षीत कुशीतून अचानक उघड्यावर येतं.

 

जंगलातील शत्रू ते क्रूर शिकारींपासून स्वत:ला कसं वाचवायचं हेही माहित नसतं, त्यात एका मोठ्या अस्वलाच्या रुपात (Grizzly Bear) तो आधार शोधतं.

 

लहानग्या जीवाचा तो सगळा जगण्याचा संघर्ष, माणूस आणि प्राणी, माणूस आणि निसर्गाचा संघर्ष या सिनेमात टिपला आहे.

 

या सिनेमाला अनेक आंतरराष्ट्रीय अवार्ड्सही मिळाले आहेत. याच सिनेमातील तो प्रसिद्ध सीन नंतर सगळीकडे व्हायरल होत आहे.

 

एक्स्ट्रा शॉट्स

 

मोठ्या अस्वलाचं काम हॉलिवूडमधील प्रसिद्ध बार्ट (BART – The Bear) या अस्वलानं केलं आहे. या अस्वल ‘अभिनेत्यानं’ अनेक हॉलिवूडपटात, ब्रॅड पिट, अँथनी हॉपकिन्स, अलेक बाल्डविन अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं होतं.

 

1998 साली ऑस्करच्या नॉमिनेशन जाहीर करण्यासाठी बार्टने थेट ऑस्करच्या मंचावर एन्ट्री घेतली होती



 

2000 साली  23 व्या वर्षी कॅन्सरने बार्टचा मृत्यू झाला. त्याच्या ट्रेनरसोबतचा (Doug and Lynne Seus)