मुंबई : लहान मुलांचा समावेश असलेल्या रिअॅलिटी शोवर बंदी घालावी, अशी मागणी चित्रपट दिग्दर्शक सुजीत सरकारने केली आहे. सरकारने ट्विटरवर ही मागणी केली आहे.
"हे कार्यक्रम मुलांना भावनात्मक आणि शारीरिकदृष्ट्या उद्ध्वस्त करतातच, पण कमी वयात त्यांची निरागसताही हरवते," असं सुजीत सरकार म्हणाला.
"लहान मुलांचा समावेश असलेले रिअॅलिटी शो तातडीने बंद करावेत, अशी विनंती मी अधिकाऱ्यांना करतो. हे शो मुलांना भावनात्मकदृष्ट्या उद्ध्वस्त करत आहेत आणि त्यांची शुद्धता संपवत आहेत," असं ट्वीट सुजीत सरकारने केलं.
https://twitter.com/ShoojitSircar/status/882070022629318656
काही वर्षांपूर्वी ईटीव्ही बांगलाच्या एका लहान मुलांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात परीक्षक रागावल्याने एका मुलीला धक्का बसलेला. त्यानंतर अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमात कुठल्याच स्पर्धक मुलांना रागावू नये, कमी लेखू नये असे निर्देश जारी झाले होते. काही दिवस त्याची अंमलबजावणीही झाली, पण आता पुन्हा पहिल्यासारखं सुरु आहे
दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला सुजीत सरकारने ‘रिलीज द प्रेशर’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली होती. परीक्षेच्या काळात असेलल्या दबावाशी दोन हात करण्याची कहाणी या शॉर्ट फिल्ममध्ये दाखल करण्यात आली होती.