करणच्या सिनेमात सैफच्या मुलीऐवजी चंकी पांडेची मुलगी?
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2017 03:35 PM (IST)
मुंबई : करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ दि इयर 2' या आगामी सिक्वेलसाठी बॉलिवूडमधील नवतारकांपासून स्टारकिड्सपर्यंत अनेक नावं चर्चेत होती. मात्र सैफ अली खानच्या मुलीला मागे टाकून चंकी पांडेच्या मुलीने बाजी मारल्याचं म्हटलं जात आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवी, सैफ अलीची मुलगी सारा अली खान यांच्यापासून दिशा पटानी सारख्या अनेकींची नावं लीड रोलसाठी चर्चेत होती. दोनपैकी एका हिरोईनसाठी चंकी पांडेची मुलगी अनन्याची निवड झाल्याचं मानलं जात आहे, तर श्रीदेवीची लेक जान्हवी दुसरी हिरोईन असेल. धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल हायस्कूलमधून अनन्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्यानंतर डान्स आणि अॅक्टिंग क्लासेस सुरु करुन बॉलिवूड पदार्पणाची तयारी असल्याचं तिने दाखवून दिलं आहे. अनन्याने चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचं आपल्याला सांगितलं आहे, असं चंकी पांडेने म्हटलं होतं. त्यानंतर सलमान तिला लाँच करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. 'स्टुडंट ऑफ दि इयर 2'चं दिग्दर्शन करण जोहर करणार आहे. हिरो म्हणून टायगर श्रॉफचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.