टीव्ही सीरियल 'बालिका-वधू' आणि 'ससुराल सिमर का' या सिनेमातून घराघरात प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री अविका गौर सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. अविकाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अविकाने स्वतः हा फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला असून या फोटोमध्ये ती खूप फिट आणि स्लिम ट्रिम असल्याचे दिसत आहे.
'फॅट टू फिट' होण्यासाठी अविकाने स्वतःत जबरदस्त बदल केला आहे. यासंदर्भात अविकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही लिहली असून यात ट्रान्सफॉर्मेशनची संपूर्ण माहिती दिली आहे. अविकाने तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे, की 'मला अजूनही चांगलं आठवतंय की मागच्या वर्षी मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा कोसळलेचं. स्वतःला पाहूनचं मला दुःख झालं. स्थूल झालेले हातपाय, बाहेर आलेलं पोट. जर हे सर्व थायरॉईड किंवा पीसीओडी सारख्या आजारामुळे झाले असतं तर ते ठीक होतं. कारण ते माझ्या नियंत्रणाबाहेर होते. मात्र, माझ्या खाण्यापिण्याची सवय आणि व्यायाम न केल्यामुळे हे घडले होते.
अविका या पोस्टमध्ये पुढे असेही नमूद करते की तिच्या बडौल शरीरामुळे तिला इनसिक्योर वाटत होते. या स्थूलपणामुळे तिला डान्स करण्याचे पॅशनही सांभाळका येत नव्हते. एक दिवस, या सर्वांमुळे अस्वस्थ झाल्याने, अविकाने ठरवले की आपण आता बदलले पाहिजे, त्यानंतर तिने योग्य आहारासोबतचं व्यायामावर लक्ष केंद्रीत केलं.
अविका म्हणाली की, आज जेव्हा मी स्वतःला आरशात बघते तेव्हा मला आनंद होतो. मी स्वतःला सांगते की मी सुंदर आहे. मला सर्वांना सल्ला द्यायचा आहे, की आपण ज्या गोष्टी करु शकत नाही तिकडे वेळ घालवण्यापेक्षा ज्या बदलू शकतो. त्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे.