Neha Marda Baby Girl: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मर्दाला (Neha Marda) प्रेग्नेंसीमध्ये अडचण आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नेहानं आता गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नेहाची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाली. नुकत्याच एका ऑनलाईन मुलाखतीमध्ये नेहानं बाळाच्या आणि तिच्या हेल्थबाबत माहिती दिली.
एका मुलाखतीमध्ये नेहानं सांगितलं, 'प्रेग्नेंसीदरम्यान मला माझ्या बीपीबद्दल काळजी वाटत होती. पाचव्या महिन्यात तर आणखी काळजी वाटू लागली. आमच्या डॉक्टरांनी आधीच सर्व तयारी केली होती. प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येऊ शकतात, याचा विचार आम्ही केला होता. सुदैवाने सर्व काही ठीक झाले. मला एक सुंदर मुलगी झाली आहे. बाळ आणि मी आता बरे आहोत.'
पुढे नेहानं सांगितलं, 'मला या आठवड्याच्या अखेरीस कदाचित डिस्चार्ज मिळेल. माझी मुलगी फोर्टनाइटमध्ये आहे. मी तिला कुशीत घेण्याची वाट बघत आहे. प्री-मॅच्युअर डिलीव्हरीनंतर तिला एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे मी थोडावेळच तिला पाहू शकले.'
बाळाचं नाव काय ठेवणार?
बाळाच्या नावाबद्दल नेहानं सांगितलं, 'आम्ही बाळाच्या नावाचा विचार केला आहे. आम्ही बाळाचं नाव A लेटर वरून ठेव विचार करत आहोत. आमची मुलगी नेहमी हसत राहो.' नेहा आणि आयुष्मान अग्रवाल 2012 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या 10 वर्षानंतर नेहाने गोंडस मुलीला जान्म दिली आहे. सोशल मीडियावर नेहाचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
नेहाने 2005 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. नेहा देवों के देव महादेव, डोली अरमानों की, पिया अलबेला, लाल इश्क अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये नेहानं काम केलं. 'बालिका वधू' या मालिकेमुळे नेहाला जास्त लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली होती.
नेहा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :