Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) सिनेमाने 2023 हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं या चित्रपटाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरतात. बॉक्स ऑफिस गाजवणारा महाराष्ट्राचा हा लाडका चित्रपट महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर पहाता येणार आहे. 19 मे ला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार आहे. 


दर्जेदार मालिकांप्रमाणेच अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले,"सकस मनोरंजन, सर्वांना भावणारा आशय ही स्टार प्रवाहची ताकद आहे. रसिकांना दर्जेदार मालिका आणि चित्रपट देण्याच्या हेतूने बाईपण भारी देवा सारखा सुपरहिट चित्रपट स्टार प्रवाहवर सादर होतोय. आपल्या परंपरेला जोडून मांडलेला हा चित्रपट एक यशस्वी आणि मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहवर येतोय याचा आनंद आहे". 


'बाईपण भारी देवा' कुठे पाहाल? (Baipan Bhaari Deva World Television Premiere)


'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातील महिलावर्ग खूप उत्सुक आहे. स्टार प्रवासहने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "चला साजरी करूया नात्यांची मंगळागौर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर 'बाईपण भारी देवा' रविवारी 19 मे संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर होणार आहे". तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहायला विसरु नका बाईपण भारी देवा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार 19 मेला सायंकाळी 7.00 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.






'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर या मराठी चित्रपटाने दणदणीत कमाई केली. सिनेमागृहात मोठ्या संख्येने महिला प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला. आता सिनेमागृहात धमाका केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : "बाईपण भारी देवा'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळायलाच हवा"; विवेक अग्निहोत्रींनी केलं मराठी सिनेमाचं कौतुक; केदार शिंदे म्हणाले...