मुंबई : बाहुबली फॅन्सना ज्या चित्रपटाची प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा लागून राहिली आहे, त्या 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' अर्थात बाहुबली 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?' या गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांना छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

राजामौली यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात पहिल्याच भागातील कलाकार म्हणजे प्रभास, राणा डुग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाहुबलीच्या विश्वासू कटप्पानेच त्याचे प्राण का घेतले, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे.

2015 मध्ये बाहुबलीचा पहिला भाग 'बाहुबली : द बिगिनिंग' रिलीज झाला होता. त्यानंतर जवळपास पावणेदोन वर्षांनी दुसरा भाग येत आहे. 28 एप्रिल 2017 रोजी 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीझर रिलीज झालं आहे.

बाहुबली 2 चा क्लायमॅक्स लीक होऊ नये म्हणून दिग्दर्शक राजामौलींनी चांगलीच खबरदारी घेतली आहे. एकाऐवजी तब्बल चार क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अद्यापही कोणता क्लायमॅक्स ठेवायचा, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे पडद्यावर कोणता क्लायमॅक्स दिसणार, हे सध्या कलाकारांनाही माहित नाही.

पाहा ट्रेलर