मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'मोगुल' या सिनेमात अक्षय कुमार प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'संगीताचे मुगल' गुलशन कुमार यांचा हा बायोपिक असेल. माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात गुलशन कुमार यांच्यापासून झाली. ते संगीत सम्राट होते, त्यांची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/841861776497074176

गुलशन कुमार यांची मुंबईत 1997 साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांची पत्नी सुदेश कुमारी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. सुभाष कपूर दिग्दर्शित 'मुगल' सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होईल.

संबंधित बातमी :  अक्षय कुमारचे 2017 मध्ये हे सिनेमे प्रदर्शित होणार