या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 128 रुपयांची कमाई करत आमिर खानचा ‘दंगल’ आणि सलमान खानच्या ‘सुलतान’चाही विक्रम मोडीत काढला होता. सोमवारच्या कमाईसोबत बाहुबली 2 ने नवा विक्रम स्थापित केला आहे.
शुक्रवारी रिलीज झालेल्या बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी 41 कोटी, दुसऱ्या दिवशी 40.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 46.5 कोटी रुपयांची कमाई करत बॉलिवूडचे सर्व विक्रम मोडीत काढले.
सलमानच्या ‘सुलतान’ने पहिल्या दिवशी 36.54 कोटी, तर आमीरच्या ‘दंगल’ने 29.78 कोटींची कमाई केली होती. बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी केवळ हिंदी भाषेत 41 कोटी रुपयांची कमाई केली.
‘बाहुबली 2’ सिनेमा जगभरात जवळपास 9 हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला असून, मूळ तेलुगूतील हा सिनेमा हिंदीसह अन्य सहा भाषांमध्येही रिलीज कmoरण्यात आला आहे.
एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.
बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता.
संबंधित बातम्या :