Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले नव-नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.
तमन्ना भाटियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तमन्नाने मल्टीकलर प्लाझो पॅन्ट आणि सिल्व्हर बॅकलेस क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. तमन्नाच्या या ड्रेसच्या डिझाईनपासून ते रंगापर्यंत सगळंच अप्रतिम आहे. तमन्नाच्या या घायाळ करणाऱ्या लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. तमन्नाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. शिवाय अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
तमन्नाच्या या फोटोला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. काही नेटकरी तिला म्हणत आहेत की, तमन्नाचे हे फोटो पाहून प्रभासची आठवण येत आहे. अशाच अनेक मजेदार कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
तमन्नाने यापूर्वीही असे अनेक फोटो सोशल मीडिवार शेअर केले आहेत. ती अनेकदा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. तमन्ना भाटियाचा स्टाईल सेन्स अप्रतिम आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मग तो एखाद्या कार्यक्रमासाठी तयार झाला असेल किंवा विमानतळावर स्टायलिश स्टाईलमध्ये दिसला असेल किंवा फोटोशूट असो. तिचा स्टाईल सेन्स जबरदस्त आहे.
दरम्यान, तमन्नाने नुकताच नवीन चित्रपट बबली बाउन्सरची घोषणा केली आहे. हा चित्रपट एका महिला बाउन्सरच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात तमन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग मोहालीमध्ये सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या