मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालं. 'दयावान' अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


बहुप्रतिक्षीत 'बाहुबली2' हा सिनेमा उद्या - शुक्रवारी रिलीज होणार आहे. मात्र विनोद खन्ना यांच्या निधनामुळे बाहुबलीचा आजचा प्रीमियर शो रद्द करण्यात आला आहे.

विनोद खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून आज होणार बाहुबली-२ चा प्रिमियर शो रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  बाहुबलीच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला.

"विनोद खन्ना यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी दु:खात आहे, आम्हीही या दु:खात सहभागी असून, आजचा बाहुबलीचा प्रीमियर शो रद्द करत आहोत." असं बाहुबलीच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन