Thriller Movies 2024 :   रोमान्स, कॉमेडी, ॲक्शन आणि थ्रिलर अशा विविध धाटणीच्या चित्रपटाची सगळ्यांना क्रेझ असते. यंदाच्या नव्या वर्षात कोणते चित्रपट पाहण्यास मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या वर्षीदेखील मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2024 या वर्षात थ्रिलर्स चित्रपट  प्रदर्शित होणार आहेत. उत्सुकता  वाढवणारे ही कथानक, दमदार अभिनय आणि त्याला साजेशी अॅक्शन असलेले चित्रपट कायम प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. जर तुम्ही 2024 मध्ये थ्रिलर-चित्रपट बघण्यासाठी उत्सुक असाल तर हे चित्रपट नक्कीच तुमचं मनोरंजन करतील. या वर्षात काही चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा असणार आहेत. एक नजर, या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर...


>> बर्लिन (Berlin Movie) 


अभिनेता अपारशक्ती खुराना त्याचा आगामी चित्रपट 'बर्लिन'साठी उत्सुक आहे. अतुल सभरवालसोबत तो 'बर्लिन'मध्ये दिसणार आहे. एका मूकबधिर व्यक्तीच्या भूमिकेत तो दिसणार आहे.  ज्याला गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवून अटक केली जाते. कथा जसजशी उलगडत जाते आणि वास्तव समोर येते तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचते. 'बर्लिन' चित्रपटात
 इश्वाक सिंग, कबीर बेदी आणि राहुल बोस आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. 


>> द बकिंगहॅम मर्डर्स (The Buckingham Murders)


करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'द बकिंगहॅम मर्डर्स' हा वर्षातील बहुप्रतिक्षीत थ्रिलर चित्रपट आहे. करीना कपूर या चित्रपटात  ब्रिटीश-भारतीय गुप्तहेराची व्यक्तीरेखा साकारणार आहे. तिला बकिंगहॅमशायरमधील एका खून झालेल्या मुलाचे प्रकरण सोपवले जाते. केसमुळे वेदनादायक आठवणी परत येतात आणि प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा थ्रिलर आहे. रिलीज होण्यापूर्वीच द बकिंगहॅम मर्डर्स जागतिक स्तरावर आधीच चर्चेत आहे. शोभा कपूर, एकता कपूर आणि करीना कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 



>> आर्टिकल 370 (Article 370)


यामी गौतम ही आपल्या आशयघन चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने काम केलेल्या चित्रपटांचे विषय वेगळ्या धाटणीचे असल्याचे दिसून आले. 'आर्टिकल 370' या चित्रपटातून अभिनेत्री पुन्हा एकदा कम बॅक करणार आहे. चित्रपटाचे  दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात प्रियमणी आणि अरुण गोविल यांच्यासोबत दिसणार आहे. आर्टिकल 370 मध्ये काश्मीरमधील अशांतता, दहशतवाद या विषयांचे चित्रण असणार आहे.  


>> शैतान (Shaitan)


अजय देवगण 'शैतान' नावाच्या आगामी हॉरर-थ्रिलरमध्ये आर माधवन आणि ज्योतिकासोबत काम करत आहे. त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट सगळ्यांचं लक्ष पडद्यावर खिळवून ठेवणारं यात शंका नाही. काळ्या जादूभोवती फिरणारा हा थ्रिलर भयपट आहे. विकास बहल दिग्दर्शित, शैतान 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.


>> जिगरा (Jigara)


 वासन बाला याने 'जिगरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आलिया भट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. वेदांग रैनाही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. चित्रपटाची कथा ही तुरुंगातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांभोवती फिरते. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.